महाराष्ट्राचे भविष्य दिल्ली ठरवणार; 200 पेक्षा जास्त जागा जिंकूनही मुख्यमंत्रीपद लटकून पडलंय! – संजय राऊत

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 6 दिवस उलटले तरी अद्याप मुख्यमंत्रीपदावर कोण विराजमान होणार हे निश्चित झालेले नाही. 200 पेक्षा अधिक जागा जिंकलेल्या महायुतीला त्यांचा मुख्यमंत्री ठरवता येत नाही. मुख्यमंत्री ठरवण्याचा अधिकार ज्यांच्याकडे बहुमत त्यांना आहे. युतीतील 2 पक्षांनीही सर्वाधिकार दिल्लीला दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे भविष्य दिल्ली ठरवणार आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.

विधानसभा निवडणुकीत भाजपला 130 पेक्षा जास्त जागा मिळाल्या. जवळजवळ पूर्ण बहुमत असतानासुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद असे का लटकून पडले हे कळत नाही. अर्थात जनतेला त्यात इंटरेस्ट नाही, कारण हा जनतेचा कौल नाही. तीन पक्षांना पाशवी बहुमत असतानाही राज्यात सरकार नाही. विधानसभेची मुदतही 26 नोव्हेंबरला संपलेली आहे. याठिकाणी आम्ही असतो तर एव्हाना राष्ट्रपती राजवट लावून आम्हाला सत्तेपासून दूर ठेवले असते. पण नियम कायदे फक्त विरोधी पक्षासाठी, बहुमत प्राप्त झालेल्या महायुतीला नाही, असे राऊत म्हणाले.

मिंधेंनी यापुढे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊ नये; संजय राऊत कडाडले

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी स्वागत आहे. कारण मुख्यमंत्री महाराष्ट्राचा असतो. पंतप्रधान, मुख्यमंत्री हा एका पक्षाचा नसतो, तर तो देशाचा, राज्याचा असतो. पण भाजप सत्तेत आल्यापासून पंतप्रधान, मुख्यमंत्री हे एका पक्षाचे झाले. पण फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याचा विचार केला तर नक्कीच आम्ही काळजीपूर्वक पाहू, असेही राऊत यावेळी म्हणाले.