गोहत्या करणाऱ्यांना मोक्का लागणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गोहत्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (मोक्का) गुन्हा दाखल केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.

श्रीगोंदा तालुक्यातील ससाणेनगरसह जिह्यात वाढलेली गोतस्करी व गोहत्येच्या मुद्दय़ावर विधानसभेत लक्षवेधी सादर झाली होती. त्यावर झालेल्या चर्चेनंतर गोहत्या, गोतस्करीविरोधात कठोर कायदा करा, अशी मागणी सदस्यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेऊन, वारंवार गोहत्यासंबंधी गुन्हे नोंद होत असतील तर मोक्काअंतर्गत कारवाई होईल, असे जाहीर केले.