
विक्की कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाने अजय देवगणच्या ‘सिंघम’चा रेकॉर्ड मोडला. 14 फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. ‘छावा’ने सातव्या दिवशी 22 कोटींचे कलेक्शन केले असून आतापर्यंत 219.75 कोटींचे कलेक्शन केले आहे. ‘छावा’ने रविवारी सुट्टीच्या दिवशी सर्वात जास्त 48.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. ‘छावा’ विक्की कौशलच्या करीअरमधील सर्वात जास्त सुपरहिट चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने ‘भूलभुलैया-3’ आणि ‘सिंघम अगेन’चाही रेकॉर्ड मोडला आहे.