16 वर्षांच्या मुलीने स्वत:चीच जीभ कापून देवाला अर्पण केली! धक्कादायक प्रकर समोर

देवा- धर्माच्या नावाखाली अनेक अंधश्रद्धेच्या घटना देशात अजूनही घडत आहेत. भोंदूबाबांच्या सांगण्यावरुन लोक देवाला बळी देतात. याक्षणी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता सांधूंचे एैकून स्वत: चे नुकसान करुन घेतात. छत्तीसगढमध्ये अशीच एक घटना घडली आहे. एका मुलीने आपली जीभ कापून ती देवाला अर्पण केली आहे. आणि मंदिराच्या आवारात बसून ध्यान करू लागली. एवढेच नाही तर स्वत: ला ईजा करूनही उपचार घेण्यास तिने मनाई केली.

छत्तीसगडमधील सक्ती जिल्ह्यातील देवरघटा गावातील आरुषी चौहान या मुलीने हे कृत्य केले आहे. ती 16 वर्षांची असून इयत्ता 11वीत शिकते. आरुषीने मंदिरातच जीभ कापून देवाला अर्पण केली. यानंतर ती मंदिराच्या आवारातच बसून प्रार्थना करू लागली. कुटुंबीयांना या घटनेची माहितीमिळाताच त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा शोध घेतला. चौकशी करत असताना आरोषीजवळ एक ‘चिठ्ठी’ सापडली. ज्यामध्ये आरुषी साधनामधून उठल्यास तिची हत्या केली जाईल, असे लिहिले होते. असे आरुषीच्या कुटुंबीयांनी सांगितले.

आरुषीला मिळालेली चिठ्ठी ही छत्तीसगडी भाषेत लिहिलेली आहे. “काकरो आवाज नहीं आनी चाहिए, गाडी या आदमी काकरो नहीं | अगर मैं उठ रहा, तो सबके मर्डर हो जाही… म्हणजे ध्यान साधनेत बसताना कोणत्याही प्रकारचा आवाज येता कामा नये. तसेच ध्यान साधनेतून जर मला उठवण्याचा प्रयत्न केला तर माझी हत्या होईल असे लिहिले होते. त्यामुळे आरोषीच्या कुटुंबीयांनी घाबरुन तिला उठवण्याचा प्रयत्नही केला नाही.

आरुषीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी लगेचच डॉक्टरांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आरोषीने उपचार घेण्यास नकार दिला. आरुषीच्या घरच्यांनीही मुलीला समजावलं नाही. कुटुंबीय आणि ग्रामस्थांनीही पोलिसांना मंदिरात जाऊ दिले नाही. आणखी दोन दिवस ती ध्यानात मग्न राहणार असल्याचे आरुषीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.