
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलाने या भागात नक्षलवादाविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. सुरक्षा दलाच्या या कारवाईदरम्यान सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासून नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार सुरू आहे. सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षआ दलाला मोठे यश मिळाले आहे. या चकमकीत 25 लाख रुपयांचे बक्षीस असलेली महिला नक्षलवादी रेणुका उर्फ बानूचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.चकमकीत खातमा झालेल्या मृत महिला नक्षलवादीचे नाव रेणुका उर्फ बानू उर्फ चैते उर्फ सरस्वती असे आहे, ती वारंगल जिल्ह्यातील कडवेंडी येथील रहिवासी आहे. परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे. सुरक्षा दलाने घटनास्थाळाहून इन्सास रायफल आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
सुरक्षा दलाने सुरू केलेल्या नक्षवाद्यांविरोधातील मोहिमत 2025 या वर्षात आतापर्यंत 119 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दंतेवाडाच्या गीदम पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि विजापूरच्या भैरमगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेलगोडा, अकेली आणि बेलनार या सीमावर्ती गावांमध्ये सुरक्षा दलाच्या नक्षलविरोधी मोहिमा सुरू आहेत. या सुरक्षा दलाच्या कारवाईदरम्यान सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासून नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार सुरू आहे. या चकमकीत 25 लाखांचे बक्षीस असलेल्या रेणुका या महिला नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला. घटनास्थळी INSAS रायफल, दारूगोळा आणि दैनंदिन वापराच्या इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.