छत्तीसगडमधील विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या ताफ्याला लक्ष्य करत हल्ला केला आहे. नक्षलवाद्यांना सुरक्षादलाला लक्ष्य करत आयईडी स्फोटकांचा स्फोट घडवला. या नक्षलवादी हल्ल्यात सुरक्षा दलाचे 9 जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी वाहनात आयईडी स्फोट केल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्हा राखीव दलाचे (डीआरजीचे) जवान वाहनातून प्रवास करत होते, त्यांना लक्ष्य करून नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट केला. स्फोटकांनी भरलेले वाहन सुरक्षा दलाच्या ताफ्याजवळ आले आणि स्फोट झाला, असे सांगण्यात येत आहे.