
तमाम हिंदुस्थानचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात गरळ ओकणाऱया आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नागपूरच्या शिवशंभूद्रोही प्रशांत कोरटकर आणि केशव वैद्यला पाठीशी घालणाऱया महायुती सरकारविरोधात संताप कायम आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री यांना शिवप्रेमींनी काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी दडपशाही करीत इंडिया आघाडीचे कार्यकर्ते आणि शिवप्रेमींना ताब्यात घेतले.