
मालवणमधील राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नव्याने उभारण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागअंतर्गत हाती घेण्यात आले असून या कामाची पायाभरणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज करण्यात आले. राजकोट किल्ल्यावर शिवपुतळय़ासाठी उभारलेल्या भव्य चौथऱयावर विधिवत पूजाअर्चा करून पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली. तसेच या पुतळय़ाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना पुतळय़ाच्या कामाविषयी चित्रफित दाखविण्यात आली.