छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात दाखल

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनच्या व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियममधून आज विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आली. आता ही वाघनखे सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुरातन वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. यानिमित्त उद्या सातारा येथे विशेष सोहळा पार पडणार आहे.

ही वाघनखे तीन वर्षांसाठी महाराष्ट्रात आणण्याबाबतचा करार करण्यात आला आहे. या करारानुसार वाघनखे लंडनहून आणण्यात आली. राज्यातील जनतेला ही वाघनखे पाहता यावीत यासाठी टप्प्याटप्प्याने चार वस्तुसंग्रहालयात ती ठेवण्यात येणार आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, नागपूरमधील सेंट्रल म्युझियम, कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये ही वाघनखे ठेवण्यात येणार आहेत.