
‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’ अशा गगनभेदी घोषणांनी आज मुंबई-महाराष्ट्रासह संपूर्ण देश दणाणून गेला. निमित्त होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे! या सोहळ्यानिमित्त अनेक ठिकाणी सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
शिवसेना नेते, रेल कामगार सेनेचे अध्यक्ष विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रेल्वे कामगार सेना कार्याध्यक्ष संजय जोशी आणि सरचिटणीस दिवाकर देव यांच्या नेतृत्वाखाली रेल कामगार सेनेने आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शिवजयंती साजरी केली. शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी मध्य रेल्वेचे मुख्य कार्मिक अधिकारी हर्ष वाजपेयी, चंद्रकांत विनरकर, सूर्यकांत आंबेकर, अमोल चौधरी, आशीष दळवी, अशोक तांबोळी, संदीप चव्हाण,प्रशांत कमानकर, तुकाराम कोरडे, विकास पाटील, अमोघ निमसुडकर, शैलेश प्रधान, अनिल बिडवे, अभय वर्तक, संतोष देवळेकर, कमलेश जेठानी संजय चव्हाण, योगेश जाधव, नरेंद्र तळेकर, संतोष शेलार, संतोष गावडे, शैलेश कांबळे उपस्थित होते.
मुलुंड पश्चिम शिवसेना शाखा 104 च्या वतीने शाखाप्रमुख राजेश साळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी, माजी आमदार विभाग प्रमुख रमेश कोरगावकर, विभाग संघटक राजराजेश्वरी रेडकर, विधानसभा प्रमुख नंदिनी सावंत, युवासेना कार्यकारिणी सदस्य राजोल पाटील, उपविभाग संघटक हेमलता सुकाळे, उपविभाग प्रमुख सीताराम खांडेकर, नितीन चौरे, शाखा संघटक गीता साळवी, विधानसभा संघटक पुष्पा अनपट, समन्वयक योगिता रांजोळी, शीला सोनवणे उपस्थित होते. कार्यालय प्रमुख संजय सावंत, तुषार शिंदे, अभिमन्यू पांडे, विनोद बाविस्कर, सुरेश चव्हाण, विजय सावंत, राज ठाकरे, अशोक पडोळ, राजू दाते, मधुकर पवार, विजय आव्हाड, सागर घोडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
अंधेरी पूर्व सहार येथील हॉटेल आयटीसी मराठा येथे भारतीय कामगार सेनेतर्फे शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याला भारतीय कामगार सेना चिटणीस संदीप राऊत, युनिट अध्यक्ष विजय तावडे, सरचिटणीस संजय जाधव, कमिटी मेंबर मुमताज खान, क्लिटस कॅस्टलिनो, रुपेश कहाणे, किरण वझे आदी उपस्थित होते.
शिवसेना शाखा क्रमांक 206 शिवडी पूर्व विभागातील शिवसैनिकांच्या वतीने शिवडी किल्ल्यावर शिवजयंती साजरी केली. यावेळी माजी नगरसेवक सचिन पडवळ, शाखाप्रमुख हनुमंत (बैजू) हिंदोळे, शाखा समन्वयक भारती देवाडीगा तसेच शिवडी पूर्व परिसरातील पदाधिकारी, शिवसैनिक व शिवडी कोळीवाडा म्युनिसिपल शाळेचे विद्यार्थीदेखील उपस्थित होते.
शिव आदर्श सेवा मंडळातर्फे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी उपनेते राजकुमार बाफना, अरुण दुधवडकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, विधानसभा संघटक अरविंद बने, विभाग संघटक युगंधरा साळेकर, माई परब, विजय पवार, सुप्रिया शेडेकर, गुणवंत सेठ, शिवाजीराव कांगणे आदी उपस्थित होते.