शिवकालीन किल्ल्यांवरील पवित्र जल छत्रपती शिवाजी महाराज म्युझियममध्ये ठेवणार

राज्यातील तरुणांना सशस्त्र दलात सामील होण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हिंदुस्थानी लष्कराच्या दी आसाम रेजिमेंटच्या कंधराव्या बटालियनच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नऊ किल्ल्यांवरील ऐतिहासिक तलावातील जल सायकल मोहिमेद्वारे गोळा करून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये ठेवण्यात येणार आहे.

आर्मी डेचे औचित्य साधून हिंदुस्थानी लष्कराच्या आसाम रेजिमेंटमार्फत ही मोहीम राबवण्यात येणार आहे. मुंबईतील पुलाबा मिलिटरी स्टेशनपासून या मोहिमेला सुरुवात झाली आहे. कारगिल विजय दिनी या मोहिमेचा समारोप होईल. यासाठी सुमारे 800 किमीची सायकल मोहीम राबवण्यात येणार आहे. नऊ किल्ल्यांवर ही अंतर सायकलवरून पूर्ण केले जाईल. राज्याच्या पर्यटन व सांस्पृतिक विभागाच्या वतीने या मोहिमेच्या खर्चासाठी पाच लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. डिझाईन केलेल्या एका खास कंटेनरमध्ये हे पाणी गोळा करून ठेवण्यात येईल. मोहिमेच्या अखेरीस हे जलपुंभ पेंद्रीय संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या संचालकांच्या सुपूर्त करण्यात येणार आहे.

कोणत्या किल्ल्यांवरील जल

शिवनेरी, सिंहगड, लाल महाल, तोरणा, पुरंदर, प्रतापगड, रायरेश्वर, राजगड व रायगडावरील शिवकालीन तलावातील पवित्र जल एका खास डिझाईन केलेल्या कंटेनरमध्ये भरण्यात येईल. शिवकालीन किल्ल्यांवरील हे पवित्र जल सायकलिंग टीम ट्रेकिंग मोहिमेद्वारे जमा करण्यात येईल.