एसटी भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे, परिवहन मंत्र्याचा धिक्कार असो, परिवहन मंत्री हाय.. हाय, फडणवीस सरकार मुर्दाबाद, परिवहन मंत्र्याचे करायचे काय? खाली मुंडके वर पाय अशा जोरदार घोषणांनी शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. शिवसेनेच्या वतीने भाडेवाढीच्या विरोधात राज्य शासनाचा निषेध व्यक्त करीत जोरदार आंदोलन करून बसगाड्या गेटवर थांबवल्या. एक तास चक्काजाम करून पोलिसांसह एसटी महामंडळाच्या अधिकार्यांना घाम फोडला. अखेर पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेऊन अटक केली.
राज्य सरकारने एसटीच्या तिकीट दरामध्ये 15 टक्के भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. जनसामान्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेल्या लालपरीचे भाडे वाढल्याने प्रवाशांवर तिकीटाचा अतिरिक्त भुर्दंड पडला आहे. प्रवाशांवर होणारा अन्याय दूर करण्यात यावा, भाडेवाढ तातडीने मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने आक्रमक होत छत्रपती संभाजीनगरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या गेटवर चक्काजाम आंदोलन केले. गेटवरच शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महानगरप्रमुख राजू वैद्य, राज्य संघटक चेतन कांबळे यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी गेटवरच बैठक मारली. शिवसैनिक रस्त्यात बसल्यामुळे बसचा जाण्याचा मार्ग बंद झाला. एसटीची भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे, परिवहन मंत्री हाय-हाय, परिवहन मंत्र्यांचे करायचे काय? खाली मुंडके वर पाय, फडणवीस सरकार मुर्दाबाद, गोरगरीबांचा खिसा कापणार्या सरकारचा निषेध असो, एसटी महामंडळाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. जय भवानी-जय शिवाजी, भ्रष्ट्र सरकारला गाडावेच लागणार, या घोषणांनी परिसर दणाणून सोंडला. शिवसेनेचे चक्काजाम आंदोलन सुरू होताच नागरिकही आंदोलनात सहभागी झाले. शिवसेनेच्या रणरागिणींनी बससमोर जोरदार घोषणाबाजी करीत प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले.
शिवसैनिक बसच्या टपावर चढले
शिवसेनेने भाडेवाढीच्या विरोधात चक्काजाम पुकारताच मध्यवर्ती बसस्थानकाच्या गेटवर शिवसैनिक जमा झाले. चक्काजाम आंदोलन सुरू होताच शिवसैनिक चंद्रकांत देवराज, विजय सुर्यवंशी, मंगेश भाले हे थेट बसच्या टपावर चढले. शिवसेनेचा ध्वज फडकावत भाडेवाढ रद्द झाली पाहिजे, परिवहन मंत्री हाय, हाय, शिवसेना जिंदाबाद या घोषणा देत प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले. शिवसैनिक बसच्या टपावर चढताच एसटी महामंडळाच्या अधिकार्यांची पळापळ झाली. बसस्थानकात बसेस थांबविण्यात आल्या. शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहून पोलीसांनी अधिक कुमक मागवून घेतली. या चक्काजाम आंदोलनात शिवसेनेचे राज्य संघटक चेतन कांबळे, महानगरप्रमुख राजू वैद्य, माजी महापौर सुदाम मामा सोनवणे, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, लक्ष्मीनारायण बखरिया, अशोक शिंदे, किशोर कच्छवाह, अरविंद धीवर, राजू इंगळे, चंद्रकांत गवई, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, शहर संघटक सचिन तायडे, विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी, माजी नगरसेवक विनोद सोनवणे, मंगेश भाले, कल्याण चक्रनारायण, कान्हुलाल चक्रनारायण, कमलाकर जगताप, किसान सेना जिल्हाप्रमुख नानासाहेब पळसकर, तालुकाप्रमुख आनंद भालेकर, उपतालुकाप्रमुख विष्णु जाधव, उपशहरप्रमुख प्रितेश जैस्वाल, सुरेश गायके, वसंत शर्मा, नितीन पवार, कृष्णा मेटे, सुगंधकुमार गडवे, राजेंद्र दानवे, प्रमोद ठेंगडे, शेख रब्बानी, संजय हरणे, जयसिंग होलिये, विजय सूर्यवंशी, किरण सालपे, नाना जगताप, लक्ष्मण पिवळ, सचिन वाघ, सुरेश पवार, दिनेश राजे भोसले, संतोष बारसे, प्रल्हाद घुगे, शिवाजी बचाटे, नाना पाटील, सागर निकम, ऋषिकेश हिवाळे, निखिल बारवाल, नितीन झरे, संजीवन सरोदे, दत्ता लोकरे, सचिन वाहुळ, गणेश कुलकर्णी, उमेश साळुंखे, कुणाल पाठक, लक्ष्मण मुळे, विनोद दाभाडे, दत्तात्रय वरपे, निरमल कनघर, सुभाष आडे, देविदास पवार, शैलेशसिंग रावत, श्रीराम धांडे, साहेबराव सपकाळ, सोमीनाथ गुंजाळे, बाबुलाल बिजारणे, संदीप कुमावत, भाऊसाहेब राहते, पंडित बोरसे, श्रावण उधागे, विनायक देशमुख, सुरेश व्यवहारे, निलेश घुले, मंगेश वाघमारे, सलीम खामगावकर, युवासेना सहसचिव अॅड. धर्मराज दानवे, महिला आघाडीच्या सहसंपर्क संघटक अनिता मंत्री, दुर्गा भाटी, जिल्हा संघटक आशा दातार, लता पगारे, महानगरसंघटक सुकन्या भोसले, उपजिल्हा संघटक सुनंदा खरात, अरुणा भाटी, माजी महापौर शिलाताई गुंजाळ, माजी नगरसेविका सीमा चक्रनारायण, रजनी जोशी, शहर संघटक वैशाली आरट, भागू आक्का शिरसाठ, सुनिता सोनवणे, विधानसभा संघटक मीरा देशपांडे, विधानसभा समन्वयक रेणूका जोशी, रेणुका शहा, उपशहर संघटक सारिका शर्मा, विजया पवार, संध्या कोल्हे, बबिता रेनावले, रोहिणी काळे, दिपाली पाटील, छाया देवराज, संगीता नरवडे, कल्पना मुळे आदीसह मोठ्या संख्येने नागरिक व शिवसैनिक उपस्थित होते.
राज्यभर शिवसेना आंदोलन छेडणार- अंबादास दानवे
मराठवाड्यातील प्रत्येक तालुका पातळीवरील बसस्थानकावर शिवसेना चक्काजाम आंदोलन करणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या गेटवर चक्का जाम आंदोलन करण्यात आले आहे.आगामी काळात राज्यभर शिवसेनेच्या वतीने चक्का जाम करून या शासनाला भाडेवाढ रद्द करण्यास भाग पाडले जाईल. राज्य शासनाने एसटीची 15 टक्के केलेली भाडेवाढ अन्यायकारी करणारी आहे. दोन महिन्यापूर्वी एसटी महामंडळ फायद्यात असल्याचे महामंडळाचे अध्यक्षांनी सांगितले होते. असे असताना एसटीची भाडेवाढ होणे म्हणजे सर्वसामान्यांची राज्य सरकार लूट करत आहे. दुर्दैव म्हणजे राज्याच्या परिवहन मंत्र्यालाच ही भाडेवाढ करण्यात आली असल्याची माहिती नसल्याचे शिवसेना नेते तथा विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी सांगितले.