शहरातील भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, ग्रा.पं. सदस्य व शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील सूर्या लॉनमध्ये आयोजित शिवसंकल्प मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश केला. शिंदेसह पदाधिकाऱयांनी प्रवेश केल्यामुळे भाजपला खिंडार पडले आहे.
शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा आज रविवारी सूर्या लॉनवर पार पडला. यावेळी माजी उपमहापौर राजू शिंदे, जि.प. सदस्य सय्यद कलीम, माजी नगरसेवक गोकुळ मलके, प्रल्हाद निमगावकर, अक्रम पटेल, प्रकाश गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सतीश पाटील, संभाजी चौधरी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत प्रधान, युवा मोर्चा अध्यक्ष आकाश पवार, युवा मोर्चा सरचिटणीस सौरभ शिंदे, मंडळ अध्यक्ष पैलास वाणी, शंकर म्हात्रे, प्रवीण कुलकर्णी, तालुकाध्यक्ष अभिजित पवार यांच्यासह भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
शिसोदे कुटुंबीय शिवसेनेत
पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथील रहिवासी व स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अक्षय सुदामराव शिसोदे, उपाध्यक्ष अमर बाबासाहेब शिसोदे, संचालक भूषण काशिनाथ शिसोदे, आशिष सुदामराव शिसोदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
बीआरएसच्या पदाधिकाऱयांचा प्रवेश
बीआरएसचे नेते अशोक भातपुडे, शहराध्यक्ष सुधाकर चांदणे, सुमीत चांदणे, आकाश रगडे, राहुल गवळे, विशाल ढाले, निखिल मोकळे, शिवा सुतारे, प्रमोद आव्हाड, पाशाभाई, रिपाइंचे शहर उपाध्यक्ष अशोक गवळे, शहर सचिव सुमित चांदणे, लोक जनशक्तीचे जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) शहर सरचिटणीस प्रा. पंडित क्षीरसागर, तसेच स्वाती विश्वजित गोणारकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.