निनावी ई-मेलमुळे छत्रपती संभाजीनगर खंडपीठात पळापळ, बॉम्बने उडवून देण्याची धमकी; न्यायालय परिसरात पोलिसांचा फौजफाटा

मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठ प्रशासनाच्या ई-मेलवर एक निनावी धमकीचा मेल आला. या मेलमध्ये खंडपीठ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर खंडपीठ प्रशासनाने तात्काळ ही माहिती पोलिसांना कळवली आणि पोलिसांनी तपासणी केली. या घटनेमुळे खंडपीठ परिसरात खळबळ उडाली आहे.

Nanded News – कौठा येथील घरकुल अनुदान वाटप घोटाळा, तत्कालिन गटविकास अधिकाऱ्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

मुंबई उच्च न्यायालयाचे छत्रपती संभाजीनगर येथे खंडपीठ आहे. हा परिसर कायम गजबजलेला असतो. खंडपीठाच्या प्रशासकीय ई-मेलवर दुपारी साडेबाराच्या सुमारास एक धमकीचा मेल आला होता. या मेलमध्ये खंडपीठ बॉम्बने उडून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मेल बाबतची माहिती पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी फौजफाट्यासह खंडपीठात धाव घेतली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी खंडपीठ इमारतीत तपासणी केली. या तपासणीत कुठलीही संशयस्पद गोष्ट आढळून आली नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.