Chhatrapati Sambhajinagar crime news – व्यापाऱ्याची 4 लाखांची बॅग लांबवणाऱ्या चोरट्यास बेड्या ठोकल्या

सिल्लोड तालुक्यातील चार लाख रुपये व गुन्ह्यात वापरलेली पन्नास हजाराची लोणवाडी येथून व्यापाऱ्याची चार लाखांची बॅग घेऊन सायकलवर पसार झालेल्या चोरट्याला अखेर सोमवारी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्या ताब्यातून जनावरांच्या गोठ्यात लपवून ठेवलेले चार लाख रुपये व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, एक मोबाईल असा 4 लाख 65 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव रायभान उर्फ राजधर साहेबराव दांघोडे (32) रा. अंधारी, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर असे आहे.

जनावराच्या गोठ्यात खताच्या पोत्याखाली चार लाखांची बॅग लपवून ठेवली होती. ती आरोपीने पोलिसांना पंचांसमक्ष काढून दिली. त्याच्या ताब्यातून मोटारसायकल व 15 हजारांचा मोबाईल असा 4 लाख 65 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

भुसार व्यापारी शेख अतिक रफिक शेख (34, रा. अंधारी) यांना शनिवारी सायंकाळी 4.15 वाजता सिल्लोड शहरातील एसबीआय बँकेतून ४ लाख रुपये काढले होते. व्यापाऱ्यावर पाळत ठेऊन चोरट्याने चार लाखांची बॅग 5.30 वाजता लोणवाडी ग्रामपंचायतसमोरून पळवली. या प्रकरणी रविवारी रात्री सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

शेख अतिक रफिक शेख (34) रा. अंधारी यांना नाचनवेल येथील व्यापारी प्रभू यांचे उधारीचे मुगाचे पैसे द्यायचे होते. त्यामुळे सिल्लोडच्या आंबेडकर चौकातील एसबीआय बँकेत 11 ऑक्टोबर रोजी मोटारसायकलने (एम एच 20 बीयू 960) आले होते. त्यांनी बँकेतून 4.15 वाजता चार लाख रुपये काढले. तेव्हापासून त्यांच्यावर अज्ञात मोटार सायकलस्वाराने लक्ष ठेवले होते. तो त्यांचा पाठलाग करत होता.

व्यापारी शेख अतिक यांनी शहरात एका ठिकाणी सफरचंद घेतले व नंतर ते मोटारसायकलवर शेलगावकडे निघाले होते. पण पाऊस सुरू असल्याने ते भराडी गावात थांबले. शेलगाव जाणे टाळून घरी अंधारीकडे जाण्यासाठी दिडगाव, उपळी, मांडगाव मार्गे लोणवाडी येथे 5.30 वाजता आले. तेथे ग्रामपंचायतजवळ पैशाची पिशवी मोटारसायकलवरील पेट्रोलच्या टाकीवर ठेऊन फोनवर बोलत उभे असताना अचानक पाठीमागून लाल रंगाच्या मोटारसायकलवर आलेल्या चोरट्याने पैशाने भरलेली पिशवी झटका मारून तेथून पळ काढला.

शेख अतिक यांनी लगेच आरडाओरडा केला असता नागरिक जमा झाले. त्यांनी त्या मोटारसायकलस्वाराचा पाठलाग केला होता. पण तो चोरटा आढळला नाही. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी सिल्लोड शहर, भराडी, उपळी व ठिकठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर हा तपास स्थानिक गुन्हे शाखेने केला.

पोलीस निरीक्षक सतीश वाघ, सहायक फौजदार एच.सी. थोटे, पोहेकॉ भालेराव, खंदारे, पाटील, पी.एन. धुमाळ यांनी सापळा रचून आरोपीला अंधारी येथून त्याच्या राहत्या घरातून अटक करून सिल्लोड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले.