
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 24 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून जालना जिल्हा पोलीस दलातील पोलिसाने पोलीस क्वार्टर्समधील निवासस्थानामध्ये सतत दोन महिने शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली.
पोलीस खात्याची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये, म्हणून या घटनेबाबत पोलीस प्रशासनाकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे. जालना पोलीस असलेल्या संदीप वसंत सोनवणे (28) याने छत्रपती संभाजीनगर येथे नर्सिंग अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात अडकवले होते. शिपाई सोनवणे याने या तरुणीला तो राहत गुन्हा असलेल्या पोलीस क्वार्टर्स येथील निवासस्थानी बोलावून 9 ऑक्टोबर 2024 ते 2 डिसेंबर 2024 या दरम्यानच्या काळात तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. शिपायाने तरुणीसोबत लग्नाचे वचन न पाळता दुसऱ्याच तरुणीसोबत लग्न ठरविले होते. ही बाब त्या तरुणीला कळताच दाखल तिने तालुका जालना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली.
याप्रकरणी पोलिसांनी शिपाई संदीप वसंत सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पिंक मोबाईल पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. पुण्यातील बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात वातावरण तापलेले असतानाच ही घटना घडल्यामुळे पोलीस प्रशासनाने या घटनेबाबत कमालीची गुप्तता बाळगली.