‘छावा’तील मुघलांचा अत्याचार पाहून पडदा फाडला

विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘छावा’ चित्रपटाला देशभरातील प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात दाखवलेल्या मुघलांचा अत्याचार सहन न झाल्याने एका प्रेक्षकाने मल्टिप्लेक्सची स्क्रीन फाडल्याची घटना गुजरातमधील भरुच येथे घडली आहे. या चित्रपटात मराठा आणि मुघल यांच्यातील संघर्ष दाखवला आहे. स्क्रीन फाडणाऱया प्रेक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. जयेश वसावा असे या आरोपीचे नाव आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत विक्की कौशल, तर महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत रश्मिका मंदाना आणि औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्ना आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारीला देशभरात प्रदर्शित झाला आहे.