महाडच्या चवदार तळ्याजवळ मनुस्मृती जाळण्याचे आंदोलन करण्याचा आमदार जितेंद्र आव्हाड यांचा हेतू चांगला होता. मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात चंचू प्रवेश कशाला, असा सवाल करीत मंत्री छगन भुजबळ यांनी आव्हाड यांची पाठराखण केली.
मनुस्मृतीतील काही श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याला राज्यातून विरोध होत आहे. महाडच्या चवदार तळ्याजवळ जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती जाळली. त्या वेळी अनावधानाने त्यांच्याकडून डॉ. आंबेडकर यांचा पह्टो असलेले पोस्टर फाडले गेले. त्याबद्दल त्यांनी माफी मागितली. मनुस्मृती जाळण्याचा त्यांचा हेतू चांगला होता. मनुस्मृती जाळलीच पाहिजे. अचानक तिच्यातील काही श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा विषय आलाच कसा? असा सवाल भुजबळ यांनी केला. शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे बहुजन समाजाचे असताना मनुस्मृतीची भलावण करतात याचे दुःख होत आहे, असेही भुजबळांनी स्पष्ट केले.