अजित पवार समर्थकांमध्ये खळबळ, अमित शहांच्या दौऱ्यात भुजबळांची जवळीक चर्चेत

अजित पवार गटाचे नेते’ असे म्हणणे टाळून ‘एनडीएचे नेते छगन भुजबळ’ असा उल्लेख करून भाजप भुजबळांबरोबर असल्याचे संकेतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिले. यातून भुजबळांना भाजपचीच फूस असल्याचे अधोरेखित होत असल्याने अजित पवार समर्थकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. अजित पवार आणि भुजबळ यांच्यात सध्या विस्तवही जात नाही अशी परिस्थिती आहे.