
भाजपचे सवाशे आमदार आहेत आणि ही संख्या वाढतच चालली आहे, असे नमूद करताना एक नंबरचा पक्ष करण्यासाठी काय काय करावं लागतं हे लक्षात घ्या, असे विधान अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केले.
आमचा पक्ष राज्यात एक नंबरचा होईल असे कुणी म्हणत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. ते ऐकायलाही चांगलं वाटतं, पण त्यासोबत इतर गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. भाजपचे आमदार किती, आपले किती, आपल्याला कुठून कुठे जायचे आहे याचाही विचार केला पाहिजे, असे भुजबळ म्हणाले.