
‘छावा’ चित्रपटातील बहुतांशी शुटींग हे साताऱ्यातील लिंब या गावात झाले असून, या गावाची खासियत म्हणजे या गावातील बारामोटेची विहीर. बारामोटेची विहीर ही वास्तूकलेचा उत्तम नमुना म्हणून ओळखली जाते. याच विहीरीची चर्चा आता जगभरात होऊ लागली आहे. ‘छावा’ चित्रपटात विकी कौशल शंकराच्या पिंडीजवळ पूजा करतोय ते दृश्य याच विहीरीत चित्रित केलेले आहे. साताऱ्यातील बहुतांशी भागात छावा चित्रपटाचे शूटींग झाले होते. त्यामुळेच जगभरातील प्रेक्षकवर्ग आता ‘छावा’ चित्रपटातील शूटींग स्थळे शोधण्यासाठी गूगलवर शोधत आहेत.
बारा मोटेची विहीर ही सातारा शहरातील एक नावाजलेली विहीर म्हणून ओळखली जाते. बारामोटेच्या विहीरीचा इतिहास हा खूप जुना आहे. या विहीरीचे पाणी उपासण्यासाठी बारा मोटांचा वापर केला जायचा म्हणून या विहीरीला बारामोटेची विहीर असे नाव देण्यात आले होते.
1719 मध्ये ही विहीर बांधण्यात आली होती. शाहू महाराजांच्या काळात संभाजी राजांच्या पुत्राने या विहीरीचे बांधकाम केले होते. या विहीरीचा व्यास 50 फूट असून, याची खोली 110 फूट आहे. या विहीरीमध्ये अनेक छुप्या वाटा असल्याचे इतिहासामध्ये वर्णन आहे.