
सिनेमागृहात एखादा चित्रपट आला की, त्यामागोमाग त्या चित्रपटाची फॅशनही लोकप्रिय व्हायला वेळ लागत नाही. हेच आता घडत आहे ‘छावा’ सिनेमाच्या बाबतीत. ‘छावा’ सिनेमातील विकी कौशलसारखी दाढी ठेवण्यासाठी अनेकांनी आता फुल क्लिन लूकला लांब ठेवलं आहे.
हे केवळ इतकंच नाही, तर विकीकडे आता फॅशन आयकाॅन म्हणून सध्याच्या घडीला पाहण्यात येत आहे. विकीने त्याच्या कुर्त्यावर कोरलेले महाराजांचे चित्र सुद्धा चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळेच अनेकांनी आपल्या कुर्त्यावर आणि शेरवानीवर महाराजांचे चित्र काढून घेण्यासाठी लगबग केली आहे.