Chhaava box office collection- ‘छावा’ची बाॅक्स ऑफिसवर डरकाळी! तीन दिवसात दणदणीत कमाई , आकडा इतक्या कोटींवर

बाॅलीवूडमधील बहुचर्चित सिनेमांना ‘छावा’चा पंजा चांगलाच भारी पडला आहे. सिनेमागृहात टाळ्या, शिट्या आणि शिवगर्जनांनी वातावरण चांगलेच दुमदुमले आहे. सिनेमाचे मनाचा ठाव घेणारे संवाद, विकी कौशलचा अभिनय आणि अंगावर काटा आणणारा शेवट ही अशी भट्टी जमून आल्यामुळेच सिनेमागृहात हाऊसफुल्लचे फलक लागले आहेत. तिकीटबारीवर छप्परफाड कमाई करणारा 2025 मधील ‘छावा’ हा या वर्षीचा पहिलाच सिनेमा आहे.

‘छावा’ चित्रपट प्रदर्शित होताक्षणी जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. पहिल्या दोन दिवसांमध्ये ‘छावा’ने सर्वाधिक गल्ला महाराष्ट्रातून जमवला. तिसरा दिवस उजाडताच, उत्तर हिंदुस्थानात  चित्रपटाने उत्तम कमाई करण्यास सुरुवात केली आहे. 19 फेब्रुवारीला शिवजयंती असल्यामुळे, ‘छावा’ पुन्हा एकदा ब्लाॅकबस्टर कमाई करणार असे तर्क आत्तापासून लढवले जात आहेत. शिवजयंतीला सुट्टी असल्यामुळे सिनेमागृहात ‘छावा’ पाहण्यासाठी तुफान गर्दी होणार असल्यामुळे, सिनेमागृहे सुद्धा सज्ज झाली आहेत.

‘छावा’ चित्रपटाने अवघ्या तीन दिवसात 121 कोटींपेक्षा जास्त गल्ला पार करत, बाॅलीवूडमधील बहुचर्चित सिनेमांना चांगलाच शह दिला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी हा चित्रपट किमान 14 ते 20 कोटी बुकिंग करेल अशी अपेक्षा वर्तवण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात मात्र, पहिल्या दिवशी चित्रपट प्रदर्शित होताक्षणी ३३ कोटींचा गल्ला चित्रपटाने कमावला. दुसरा दिवस या चित्रपटाने 39.30 अनपेक्षित रित्या पुन्हा एकदा चांगली मुसंडी मारली. तिसरा दिवस म्हणजेच रविवारी चित्रपटाने 49.03 करोड करत, बाॅक्स ऑफिसवरील ‘पुष्पा’ चित्रपटाचाही रेकाॅर्ड मोडला. चित्रपटाने अवघ्या तीनच दिवसात 121 करोडोंचा गल्ला जमवला आहे. येत्या काही दिवसातच चित्रपटाची कमाई जगभरातून 500 करोडपर्यंत होईल, अशी आशा आता चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.


‘छावा’ चित्रपटाचे बजेट हे 130 होते, परंतु एकूणच सध्याच्या घडीला चित्रपटाने घेतलेली मुसंडी पाहता 500  कोटींचा गल्ला पार करणार अशी खात्रीदायक आशा व्यक्त करण्यात येत आहे. ‘पुष्पा-2’ चित्रपटाने प्रदर्शित होताक्षणी रविवारी 2.01 करोडोंची कमाई करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. परंतु ‘छावा’ने हा रेकाॅर्ड मोडत तब्बल 2.04 करोडोंची कमाई केली आहे.

‘छावा’ चित्रपट धर्मवीर संभाजी राजे यांच्या जीवनपटावर आधारीत चित्रपट असून, यामध्ये अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत.