गुकेश डोम्माराजूने जगज्जेत्या डिंग लिरेनचा पराभव करून बुद्धिबळात विश्वविजेतेपद पटकावले. यासाठी गुकेशला बक्षीस म्हणून 11 कोटी रुपये मिळाले आहेत. पण यातील साडे चार कोटी रुपये गुकेशला कररुपात भरावे लागणार आहेत असे सांगितले जात आहे.
कुठल्याही खेळाडूला जेव्हा सरकारडून किंवा ऑलिम्पिककडून पैसे मिळतात तेव्हा त्या खेळाडूला कुठलाही टॅक्स द्यावा लागत नाही. पण जेव्हा एखाद्या खेळाडूला मोठ्या टुर्नामेंटमधून पैसे मिळतात तेव्हा त्या खेळाडूला सरकारकडे कर भरावा लागतो. त्यानुसार गुकेशला 39 ते 42.5 टक्के एवढी रक्कम कररुपात भरावी लागणार आहे.
नव्या कररचनेनुसार गुकेशला एकूण रकमेच्या 39 टक्के कर भरावा लागणार आहे. आयकर कायदा 26 च्या 194 बी नुसार गुकेशला हा कर भरावा लागणार आहे. 11 कोटींच्या 39 टक्के म्हणजेच साडे चार कोटी रुपयांपर्यंत गुकेशला ही रक्कम भरावी लागणार आहे.