
आयपीएल 2025 च्या तिसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रविवारी मुंबई इंडियन्सवर 4 गडी राखून विजय मिळवला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी गमावून 155 धावा केल्या. तर चेन्नईने 19.1 षटकांत 6 गडी गमावून 158 धावा करत सामना जिंकला.
मुंबईची फलंदाजी
मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात रोहित शर्मा (0) बाद झाला. रायन रिकल्टनने 7 चेंडूत 13 धावा केल्या, तर विल जॅक्स 11 धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादवने 26 चेंडूत 29 धावा केल्या, तर तिलक वर्माने सर्वाधिक 31 धावा केल्या. रॉबिन मिन्झ (3), नमन (17) आणि मिचेल सँटनर (11) यांना फारशी चमक दाखवता आली नाही. ट्रेंट बोल्टने 1 धाव केली, पण दीपक चहरने 15 चेंडूत नाबाद 28 धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. चेन्नईसाठी नूर अहमदने 4, तर खलील अहमदने 3 बळी घेतले.
चेन्नईचा पाठलाग
156 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला दुसऱ्या षटकात पहिला धक्का बसला. राहुल त्रिपाठी अवघ्या 2 धावांवर बाद झाला. कर्णधार ऋतुराज गायकवाडने 26 चेंडूत 53 धावांची खेळी करत बाद झाला. शिवम दुबे (9), दीपक हुड्डा (3) आणि सॅम करन (4) बाद झाले. रविंद्र जडेजाने 18 चेंडूत 17 धावा केल्या. एमएस धोनीने 2 चेंडू खेळले. रचिन रविंद्रने 45 चेंडूत नाबाद 65 धावांची शानदार खेळी खेळत चेन्नईला विजय मिळवून दिला.