चेन्नईतील सॅमसंगच्या कारखान्यात सुरू असलेल्या संपाचा फटका पंपनीला बसला आहे. संपामुळे पंपनीच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. सणासुदीच्या काळात टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशिनचे उत्पादन विस्कळीत होत आहे. शाओमी आणि व्हिवोसारख्या ब्रँड्सशी आक्रमक स्पर्धा आणि ऑफलाइन किरकोळ विक्रेत्यांशी असलेले विवाद सॅमसंगसाठी मोठे आव्हान बनले आहेत. ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरमधील किमतींमध्ये मोठी तफावत, कमी नफा आणि स्टॉक उपलब्धतेतील अनिश्चितता कारणांमुळे किरकोळ विक्रेते नाखूश आहेत.
सॅमसंग कंपनी हिंदुस्थानात मोठी कर्मचारी कपात करण्याची तयारी करत आहे. कंपनी सध्या आर्थिक तोटय़ात असल्याने सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्समध्ये 9 ते 10 टक्के म्हणजेच जवळपास 200 कर्मचारी कपात करण्यात येणार आहे. सॅमसंगच्या विक्रीत सातत्याने घट होत आहे. चेन्नईतील सॅमसंगच्या कारखान्यात सुरू असलेल्या संपाचा सणासुदीच्या काळात कंपनीच्या उत्पादनावर विपरित परिणाम होत आहे.
सॅमसंगच्या कर्मचारी कपातीमुळे अनेक मोठय़ा अधिकाऱ्यांना घरी बसावे लागू शकते. बाजारातील घसरणीमुळे सॅमसंगने कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने सध्या नवी नोकरी भरती थांबवली असून अधिकाऱयांच्या रिक्त जागांवर कोणत्याही पद्धतीने भरती केली जात नाही. सॅमसंगच्या स्मार्टफोन शिपमेंटमध्ये 15.4 टक्क्यांनी घट झाली आहे. कंपनीचा व्हॉल्यूम मार्पेट शेअर 12.9 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.