चेंबूरमधील एसआरएच्या इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इमारतीमध्ये काही रहिवाशी अडकल्याची भीती असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.