
मेट्रोचे काम सुरू असताना चेंबूरच्या अमर महल जंक्शन येथील पालिकेच्या 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली. जलवाहिनीला गळती लागल्याने जलवाहिनी 24 तास बंद केली जाणार असून तिच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे चेंबूर, घाटकोपर, कुर्ला, माटुंगा, वडाळय़ात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम पालिकेकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून काम पूर्ण होईपर्यंत पाणी जपून व काटकसरीने वापरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.