
चेंबूरमधील एका बिल्डरवर भर चौकात रहदारीच्यावेळी गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. या बिल्डरच्या कारवर काही अज्ञात लोकांनी गोळीबार केला, यात एक जण जखमी झाला आहे. सद्रुद्दीन खान (वय 50) असे त्याचे नाव असून तो नवी मुंबईतील बिल्डर आहे.
सद्रुद्दीन हे बेलापूरला राहतात. बुधवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या घरी परतत असताना चेंबूरमधील डायमंड गार्डन सिग्नल परिसरात त्यांच्या गाडीवर बाईकवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात एक जण जखमी झाला असून त्यांच्यावर झेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोवंडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.