
अल्पवयीन मुलीचे अपहरण तसेच लैंगिक अत्याचार करून तिच्या निघृण हत्येच्या घटनेने कल्याण हादरून गेले होते. या प्रकरणातील आरोपी नराधम विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी या दोघांविरोधात कोळसेवाडी पोलिसांनी ९४८ पानांचे दोषारोपपत्र कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात आज दाखल केले. फाशीच्या कचाट्यातून आरोपी सुटू नये यासाठी पोलिसांनी अनेक पुरावे जमा करत 60 दिवसांनंतर आरोपपत्र दाखल केले.
नराधम विशाल गवळी याने 23 डिसेंबर 2024 रोजी आठ वर्षांच्या मुलीचे अपहरण केले. तिच्यावर पाशवी लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली. गुन्ह्यात विशालला त्याची पत्नी साक्षी हिने मदत केली होती. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणात आधी साक्षी गवळीला अटक केली. तिच्या खुलाशानंतर शेगावमधून एका सलूनमधून विशाल गवळीला अटक केली. मुलीच्या मृत्यूनंतर विशाल आणि साक्षी या दोघांनी मुलीचा मृतदेह बापगाव परिसरात फेकून दिला होता. तांत्रिकदृष्ट्या सर्व पुरावे जमा केले. मुलीचे अपहरण ते तिचा मृतदेह फेकून दिल्या प्रकरणाचे सीसीटीव्ही पुरावे पोलिसांकडे आहेत.
फास्ट ट्रॅक कोर्टात खटला
डीसीपी अतुल झेंडे, कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे आणि तपास अधिकारी गणेश न्यायदे यांनी दोषारोप पत्र दाखल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कुठली त्रूटी राहू नये याची काळजी घेतली आहे. जलद गती न्यायालयात हा खटला चालवला जाणार असून सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम हे काम पाहणार