
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात वांद्रे पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा होता तसेच आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे उपलब्ध असल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे. 16 जानेवारी रोजी अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात घुसून हल्लेखोराने सैफवर चाकूने वार केले. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी बांगलादेशी असलेल्या मोहम्मद शरीफुल इस्लाम याला 19 जानेवारी रोजी ठाण्यातून अटक केली होती.