
टोरेस घोटाळा प्रकरणात आरोपत्र दाखल करण्यात आलं आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून आठ जणांविरोधात मुंबई सत्र न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. 142 कोटी 58 लाखांची फसवणूक झाल्याची आरोपपत्र नोंद आहे.
टोरेस ज्वेलरी ब्रँड चालवणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित कंपनीने लाखो नागरिकांची कोटयवधींची फसवणूक केली असून याप्रकरणी 10 हजार 848 लोकांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली होती. गुंतवणूकदारांचा पैसा हवालामार्फत आरोपींनी पद्धतशीर परदेशात पाठविला. त्यांचे पुढचे टार्गेट श्रीलंका होते. पसार आरोपींमध्ये आठ युव्रेनचे, एक टर्किश, एक उजबेकिस्तान, एक रशियन नागरिक आहेत. यातच आज आरोपींविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे.