30 एप्रिलपासून चारधाम यात्रा सुरू होणार

उत्तराखंडमधील चारधाम यात्रा (केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री) येत्या 30 एप्रिलपासून सुरू होणार आहे. या यात्रेसाठी भाविकांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाने या यात्रेसाठी संपूर्ण यात्रेच्या मार्गाला 10-10 किलोमीटरच्या सेक्टरमध्ये विभागणी केली आहे. प्रत्येक सेक्टरमध्ये 6 पोलीस कर्मचारी तैनात असतील. सर्वात आधी गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे उघडतील. त्यानंतर 2 मे रोजी केदारनाथ धामचे आणि त्यानंतर 4 मे रोजी भगवान बद्रीनाथचे दरवाजे उघडतील.