वक्फ सुधारणा कायद्यावरून जम्मू–कश्मीर विधानसभेत गदारोळ, एनसी, भाजपा आमदारांमध्ये धक्काबुक्की

वक्फ सुधारणा कायद्यावरून जम्मू-कश्मीर विधानसभेत आज प्रचंड गदारोळ झाला. सत्ताधारी नॅशनल का@न्फरन्सच्या आमदारांनी वक्फ सुधारणा कायद्यावर स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी करत पेंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विधानसभा अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन आमदारांनी घोषणाबाजी केली. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगत विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय देण्यास नकार दिला. त्यामुळे आमदारांनी आणखी गदारोळ केल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहपूब करण्यात आले.

तातडीच्या सुनावणीस सुप्रीम कोर्टाची मान्यता

ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने वक्फ सुधारणा कायदा घटनात्मकदृष्टय़ा अवैध असल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. या प्रकरणी सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय पुमार आणि के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने तातडीच्या सुनावणीसाठी मंजुरी दिली. जमियत उलेमा-ए-हिंद, एआयएमआयएम आणि आपचे आमदार अमानुतुल्लाह खान आणि काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद यांनी विधेयकाविरोधात यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

ओमर अब्दुल्ला, रिजिजू भेटीवरून विरोधक आक्रमक

जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आशियातील सर्वात मोठय़ा टय़ुलीप गार्डनमध्ये फेरफटका मारताना दिसले. यावरून विरोधकांनी ओमर अब्दुल्ला यांच्यावर जोरदार निशाणा साधला. रिजिजू यांच्यासोबत वक्फ बंधुभाव राखण्यासाठी ओमर अब्दुल्ला यांनी रिजिजूंना रेड कार्पेट अंथरले, असा आरोप विरोधकांनी केला. अब्दुल्ला आणि रिजिजू यांच्या भेटीचे पह्टो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधक अधिक आक्रमक झाले.