
छत्रपती शिवाजी महाराज मैदानात सकाळ-संध्याकाळी मोठ्या संख्येने नागरिक चालण्यासाठी, पळण्यासाठी तसेच खेळण्यासाठी येतात. बरेचजण स्वतःची खासगी वाहने घेऊन येतात आणि कशीही, कुठेही पार्क करतात. परिणामी दक्षिण व उत्तर केळुसकर मार्गावर वाहतूककोंडी होत असल्याने त्यावर वाहतूक पोलिसांनी तात्पुरता तोडगा काढला आहे. 26 एप्रिलपासून 25 जुलैपर्यंत त्या मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार मैदानालगत पहाटे 5.30 ते रात्री 11.30 वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहने उभी करता येणार, तर केळुसकर मार्गावरील इमारतीलगत रात्री 11.30 ते पहाटे 5.30 या वेळेत वाहने उभी करता येणार आहेत.