मोदींच्या सभेसाठी नवी मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल

खारघरच्या सेंट्रल पार्कवर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार असल्याने पोलिसांनी नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल केला आहे. काही मार्गांवर सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत वाहनांना प्रवेशबंदी केली असून काही मार्गांवर वाहने उभी करण्यास मनाई केली आहे. तसेच काही मार्गांवर सभेसाठी येणाऱया वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण नवी मुंबईत वाहतूककाsंडी होण्याची शक्यता आहे.