चांद्रयान 3 प्रज्ञान रोव्हरची जबरदस्त कामगिरी; चंद्राच्या पृष्ठभागावर शोधले प्राचीन विवर

हिंदुस्थानचे चांद्रयान 3 चंद्रावर उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर सतत नवनवीन शोध घेत आहे. प्रज्ञान रोव्हरने दिलेल्या माहितीमुळे संशोधकांनी अनेक पैलूंचा अभ्यास करता येत आहे. आता चांद्रयान 3 च्या प्रज्ञान रोव्हरने महत्त्वाची माहिती दिली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर एक मोठे प्राचीन विवर (क्रेटर) प्रज्ञानला सापडले आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, हे विवर 160 किमी मोठे आहे. चांद्रयान 3च्या लॅण्डिंग साईटजवळच आहे. याबाबत अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबच्या वैज्ञानिकांकडून प्रकाशित केलेल्या सायन्स डायरेक्टमध्ये माहिती देण्यात आली आहे.

हा क्रेटर दक्षिण-ध्रुव एटकिन बेसिन तयार होण्यापूर्वीच तयार झाले असावे. विशेष बाब म्हणजे दक्षिण ध्रुव-अटकीन बेसिन हे चंद्राच्या पृष्ठभागावर असलेले सर्वात मोठे आणि सर्वात जुने इम्पॅक्ट बेसिन आहे. प्रग्यान रोव्हरने घेतलेल्या छायाचित्रांमुळे या प्राचीन क्रेटरच्या संरचनेची माहितीही देण्यात आली आहे, ज्यामुळे चंद्राविषयी अनेक महत्त्वाचे संकेत मिळू शकतात.

मिळालेल्या माहितीनुसार, क्रेटरसोबत प्रज्ञान रोव्हरकडून मिळालेल्या माहितीनुसार जगभरातील वैज्ञानिकांचा उत्साह वाढल्याचे वृत्त आहे. या क्रेटरबद्दलची माहिती चंद्राच्या सुरुवातीच्या इतिहासाबद्दल आणि त्याच्या पृष्ठभागाबद्दलची आपली समज बदलू शकते. चांद्रयान-3 14 जुलै 2023 रोजी प्रक्षेपित करण्यात आले. यानंतर, 23 ऑगस्ट रोजी ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले.