बघा काय दिवस आलेत, बावनकुळेंच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट

बाकी कुणाला नाही, पण भाजप पक्ष आणि भाजपच्या नेत्यांसाठी ‘अच्छे दिन’ आले असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना तर आज अमरावतीत पायघडय़ा घालण्यात आल्या. फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांची उधळण करत व्रेनद्वारे हार घालून त्यांचे स्वागत केले गेले. इतकेच नाही तर अमरावतीचे भाजप शहराध्यक्ष प्रवीण पोटे-पाटील यांनी त्यांच्या कार्यालयात बावनकुळे यांच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट चढवत त्यांचा सत्कार केला. बावनकुळेंच्या या ‘गोल्डन’ सत्कारावर उलटसुलट प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटत आहेत.