मोठी बातमी: बावनकुळेंच्या मुलाच्या गाडीत ‘बीफ कटलेट’चे बिल? व्हायरल पोस्टवरून सोशल मीडियावर चर्चा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याला नागपूरमधील ऑडी अपघात प्रकरणातून वाचवण्यासाठी मिंधे सरकारकडून आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेतबाबत सॉफ्ट कॉर्नर ठेवण्यासाठी पोलिसांवर प्रचंड दबाव आणल्याचंही बोललं जात आहे. एका बाजूला संकेतची ब्लड टेस् करण्यात आलेली नाही, तसेच त्याचे नाव FIR मध्ये नोंदवण्यात आलेले नाही. आता मात्र सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे ज्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे आणि संतप्त भावनाही व्यक्त होत आहेत.

अपघातावेळी संकेत गाडीतच होता, अशी माहिती आज पोलीस उपायुक्तांनीही दिली. मग गुन्हा नोंदवताना त्याचे नाव का वगळले, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

तुम्ही बीफ खायचं अन् लोकांचं मॉब लिंचिंग करायचं, वा रे हिंदूत्व! बावनकुळेंच्या मुलाच्या गाडीतील बिलावरून संजय राऊत यांचा भाजपवर प्रहार

नागपूरच्या धरमपेठ भागात रविवारी रात्री हा प्रकार घडला होता. नागपूर शहर पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी आज यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती दिली. अपघातावेळी संकेत बावनकुळे गाडीमध्ये होता, असे त्यांनी सांगितले. ऑडीमधील संकेतचे मित्र अर्जुन हावरे आणि रोनित चित्तमवार यांना ताब्यात घेण्यात आले, परंतु ऑडी कार संकेतच्या नावावर असूनही संकेतवर काहीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

चंद्रशेखर बावन्नकुळे यांच्या मुलाच्या म्हणजे संकेतच्या ऑडी गाडीने नागपुरातील रामदासपेठेत पाच गाड्यांना धडक दिली आहे. मात्र त्याचं ना मेडिकल इन्स्पेक्शन केलं आहे ना विरोधात तक्रार. जे लोक जखमी आहेत त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार घेत असून त्यांचं बिल स्वतः बावनकुळे देत आहेत. संबंधित गाडीत लोकांना महागड्या मद्याच्या बाटल्या आणि एका पंचतारांकित हॉटेल चे चार जणांचे मांसाहारी जेवणाचे बिल आढळून आले आहे. त्यामध्ये ‘बीफ कटलेट’चे देखील बिल समाविष्ट असल्याचा दावा या मध्ये करण्यात आला आहे.

सणांच्या दिवसांत मांस भक्षण करू नये असं ज्ञान नागपूरवाले आम्हाला मात्र देत आलेच असं म्हणत सणसणीत टोला देखील या पोस्ट मधून लगावण्यात आला आहे.

दरम्यान, या संदर्भातील बातमी कुठेच फ्लॅश होणार नाही, याची दक्षता कर्तव्यदक्ष गृह खात्याने घेतली होती. सत्तारूढ नेत्यांच्या मुलांना न्याय वेगळाच असतो ना…! असं म्हणत सडकून टीका करण्यात आली आहे.

पाहा संपूर्ण पोस्ट