लाडक्या बहीणीला ‘ आधार ‘ नाही, वरोरा तालुक्यातील महिलांचा संताप

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील लाडक्या बहिणींना आधार मिळविण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. वरोरा शहरातील सर्व आधार केंद्र बंद असल्याने महिला वैतागल्या आहेत. वरोरा तालुक्यात 6 आधार केंद्र आहेत. आधार कार्डमधील त्रुटी दूर करण्यासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना रोज उंबरठे झिजवावे लागत असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

मोलमजुरी बुडवून, लहान मुलांना खांद्यावर घेऊन नागरिकांना रोज आधार कार्ड केंद्राच्या चकरा माराव्या लागत असल्याचे चित्र शहरात दिसू लागलं आहे. लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्र पूर्ततेसाठी, विद्यार्थांच्या शालेय प्रवेशासाठी तसेच शिधापत्रिकेत आधार अपडेट करण्यासाठी कार्डमध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी आधार केंद्रा समोर बघायला मिळत आहे. मात्र आधार केंद्रच बंद असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी तथा माजी नगरसेवक किशोर टिपले यांनी वरोरा आधार केंद्र तत्काळ सुरु करावे अन्यथा शिवसेने कडून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.