चंद्रपूर शहरातील वडगाव परिसरातील तीन दुकाने रात्री चोरट्यांनी फोडल्याची धक्कादायक घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. यामध्ये 2 लाख 15 हजाराची रोख रक्कम चोरट्यांनी पळविली.
चंद्रपूर-नागपूर रोडवरील वडगाव परिसरामध्ये असलेले पवनसुत इंटरप्राईजेस, चांडक मेडिकल आणि जनार्धन एजन्सी या तिन्ही दुकानात चोरट्यांनी हात साफ केला. मुख्यमार्गावरील दुकाने फोडल्याने व्यावसायिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार करीत आहे.