चंद्रपूर @44.6°, देशातील सर्वोच्च तापमान तर जगात चौथ्या क्रमांकावर

गेले 48 तास वादळ -वारा व पाऊस अनुभवलेल्या चंद्रपूरने आज 44.6°c तापमानासह देशात सर्वाधिक तापमानाची नोंद केली. चंद्रपूर जिल्हा तापमानाच्या बाबतीत जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचला. चंद्रपुरात या तापमानामुळे दुपारच्या सुमारास शुकशुकाट दिसून आला तर चंद्रपूरच्या एरवी कमी उष्ण असणाऱ्या रात्री देखील सर्वोच्च तापमानाच्या नोंदविल्या जात आहेत. यामुळे शहरातील वाहतूक मंदावली असून आगामी काळात देखील अशाच पद्धतीने चढते तापमान राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या तापमानामुळे घरातील कुलर्स अथवा एसी देखील थंडावा देईनासे झाले असून पाणीटंचाईची परिस्थिती भीषण होत चालली आहे.