चंद्रपूर – एसटीवर मंत्र्याचे फोटो चमकदार; प्रवाशांना मात्र ताडपत्रीचा आधार

>> अभिषेक भटपल्लीवार

तुटलेल्या सीट, गळकं छप्पर अशा प्रकारची दयनीय अवस्था राज्यातल्या खेड्यापाड्यातल्या एसटींची झालेली पाहायला मिळत असते. असाच प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात देखील पाहायला मिळाला. मात्र एसटीच्या कर्मचाऱ्यांनाच प्रवाशांचे होणारे हाल बघवले नाही म्हणून त्यांनी या बसच्या छतावर ताडपत्री लावली आहे. ताडपत्री लावलेल्या या लालपरी सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

जिल्हातील सिंदेवाही बसस्थानकात ब्रह्मपुरी आगाराची ही बस उभी होती. त्यावेळी बसवर घातलेल्या ताडपत्रीने सर्व प्रवाशांचे लक्ष वेधले. या बसच्या छतावर चक्क ताडपत्री पांघरलेली होती. बस भंगार स्थितीत असली तरी शासनाच्या आकर्षक जाहिराती मात्र ठळकपणे दिसत होत्या. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. बसच्या छतातुन पाणी आत येऊ नये. प्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी परिवहन महामंडळाने घेतलेली खरंतर ही खबरदारी. बस मधून विद्यार्थी, महिला, वृद्ध प्रवास करतात. त्यांची काळजी मंडळांनी घेतली. मोफत प्रवास, अर्धे टिकीट अशा योजनांमुळे परिवहन महामंडळावर अधिकचा भार पडत आहे.