चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील पोलीस इमारतीत पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. अजय मोहूर्ले असे त्या पोलिसाचे नाव असून तो बल्लारपूर पोलिस स्थानकात शिपाई या पदावर कार्यरत होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. दरम्यान मोहुर्ले यांनी दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज बल्लारपूर पोलिसांनी व्यक्त केला. आत्महत्या करण्याचं नेमकं कारण अस्पष्ट आहे. परंतू मानसिक तणावातूनच टोकाचं पाऊल उचलल्याचं परिसरात बोललं जात आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.