
चंद्रपूरमध्ये एसटी महामंडळाच्या बसला भीषण अपघात झाला आहे. चिमूर-पिंपरनेरी महामार्गावर ही घटना घडली असून या अपघातात 20 ते 22 प्रवासी जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चिमूरहून नागपूरकडे निघालेल्या एसटी बस चालकाची अचानक तब्येत बिघडली. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या खाली उतरून थेट शेतामध्ये उलटली. या अपघातात चालकासह 20 ते 22 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.