Chandrapur News – अंधारी नदीला पूर; रिसॉर्टमध्ये शिरले पाणी, बचाव पथकाने केली कर्मचाऱ्यांची सुटका

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून तुफान पाऊस पडत आहे. त्यामुळे नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून अंधारी नदीला पूर आला आहे. पूर आल्यामुळे तालुक्यातील पिंपळखुट गावालगत असणाऱ्या रेड अर्थ या रेसॉर्टमध्ये पाणी शिरले. पुराचे पाणी रेसॉर्टमध्ये शिरल्यामुळे रिसॉर्टमधील कर्मचारी आतमध्येच अडकले होते. पहाटे कर्मचारी अडकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस बचाव पथकाने अंधारी नदीतून धोकादायक प्रवास करत सर्व कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका केली.