
लोको पायलेट आणि टीटी यांच्यात राडा झाल्याची घटना बल्लारशाह रेल्वे स्थानकावर घडली. यावेळी लोको पायलटवर टीटीईने साखळीने हल्ला केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नवजीवन एक्स्प्रेसने बडनेराला जाण्यासाठी लोको पायलट बल्लारशाह रेल्वे स्थानकावर पोहचला. लोको पायलटने ट्रेनच्या टीटीईकडे आरक्षित सीटची मागणी केली. यादरम्यान टीटीई आणि लोको पायलटमध्ये बाचाबाची झाली. याचा शेवट हाणामारीत झाला. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ एका प्रवाशाने शूट केला. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लोको पायलटला झालेल्या महाराणीचा आज विरोध करण्यात आला. लोको पायलटवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोको पायलट अंकित बैरागी याने नवजीवन ट्रेनमधील टीटीई इंद्रजीत मीणा यांच्याकडे बडनेरा येथे जाण्यासाठी आरक्षित सीटची मागणी केली होती. मात्र काही कारणास्तव टीटीई आणि लोको पायलट यांच्यात वाद झाला. त्यात पायलटसह अनेकजण गंभीर जखमी झाले.