Chandrapur News – थरारक घटना! बघता बघता डोळ्या देखत वाहून गेला 13 वर्षांचा मुलगा

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यामध्ये थरारक घटना घडली असून एक 13 वर्षांचा मुलगा डोळ्या देखत पूराच्या पाण्यात वाहून गेला.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी नाले तुडूंब भरून वाहत असून बरेच पुल पाण्याखाली गेले आहेत. नागभीड तालुक्यात विलम या गावामध्ये पूर आला होता. पूर पाहण्यासाठी रुणाल बावणे (वय 13) हा गावकऱ्यांसोबत नाल्यावरील पूलाकडे गेला होता. यावेळी पूल ओलांडताना त्याचा तोल गेला आणि तो पाण्याच्या प्रवाहात गावकऱ्यांच्या डोळ्या देखत वाहून गेला. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने त्याठिकाणी उपस्थित होते. पाण्याचा वेग पाहता पाण्यात उडी मारण्याचे कोणीही धाडस केले नाही. गावातील काही तरुणांनी पाण्यात उडी मारून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. घटनेची माहिती नागभीड पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून शोध मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)