Chandrapur News – चंद्रपूरमध्ये गणेश मंडळाची जलसंवर्धनाबाबत जनजागृतीपर अनोखा देखावा

चंद्रपूर शहरातील दत्तनगर भागात असलेले नवयुवक बाल गणेश मंडळ दरवर्षी अनोख्या देखाव्यांचे आयोजन करते. मंडळाने त्यांनी केलेल्या देखाव्यांसाठी कीर्ती मिळवली असून गेली 4 वर्ष त्यांच्या देखाव्यांना चंद्रपूर महानगरपालिकेचं बक्षीस देखील मिळालं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

यावर्षी नवयुवक बाल गणेश मंडळाने जलसंवर्धन या विषयावर जनजागृतीपर देखावा तयार केला आहे. पृथ्वीवर पाण्याचं महत्व काय आहे आणि जलसंवर्धनासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे हे या देखाव्यातून अधोरेखित करण्यात आलं आहे. या साठी मंडळाने एक ऑडिओ क्लिप तयार केली असून या ऑडिओ क्लिप च्या माध्यमातून हा सर्व देखावा विशद केला जातो. विशेष म्हणजे या मंडळात गणपतीला पाण्याचा थेंब आणि बळीराजाच्या रूपात दाखविण्यात आलं आहे. सोबतच जलसंवर्धनाशी संबंधित शासनाच्या विविध योजनांची माहिती देखील मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.