
चंद्रपूर जिल्ह्यातील कोपरना तालुक्यातील औद्योगिक नगरी अशी ओळख असणाऱ्या गडचांदूर शहरातील कापड दुकानात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली. ‘भगवती NX’ असे कापड दुकानाचे नाव आहे. कापड दुकानातील एका पिशवीमध्ये बॉम्ब सापडल्याची माहिती शहरभर पसरली आणि एकच खळबळ उडाली.
पिशवीमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळताच दुकान मालकांना पोलिसांशी संपर्क साधत त्यांना सर्व माहिती कळवली. घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस चंद्रपूर आणि गडचिरोली येथील बॉम्ब शोधक पथकांसह घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब शोधक पथकाने तपासणी केली असता पिशवीमध्ये बॉम्ब आढळून आला.
चंद्रपूर जिल्ह्यातील कोपरना तालुक्यातील औद्योगिक नगरी अशी ओळख असणाऱ्या गडचांदूर शहरातील कापड दुकानात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली. ही बातमी शहरभर पसरल्यामुळे एकच खळबळ उडाली.#Chandrapur #Viralvideo pic.twitter.com/y1iPPMT3Gn
— Saamana (@SaamanaOnline) July 31, 2024
सदर घटनेमागे नक्की कोणाचा हात आहे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दुकानाबाहेर लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यात दोन संशयित तरुण दिसली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले.
आतुष दाबेकर (वय – 23) आणि पियुष दाबेकर (वय – 23) अशी दोघा आरोपींची नावे आहेत. हे दोघेही जुळी भावंडे असून खंडणी उकळण्यासाठी सदर प्रकार केल्याची कुबली त्यांनी पोलीस तपासात दिली.
दोघांवर कर्जाचा बोझा होता आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी खंडणी उकळण्याचा प्लॅन त्यांनी आणखला. यासाठी दोघांनी कापड दुकानातील पिशवीमध्ये बॉम्ब ठेवला. बॉम्ब शोधक पथकाने सदर बॉम्ब शहराबाहेर नेत नष्ट केला आहे. सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.